..... coming soon!
Tuesday, 5 March 2013
Tuesday, 30 October 2012
AYUSH picnic cum get together @ Bhim Bandh, Waghadi
आयुश पिकनिक कम गेट टुगेदर, भीम बांध, वाघाडी
दिनांक :११/११/२०१२, रविवार
वेळ : सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००
ठिकाण : भीम बांध, सुर्या नदी, वाघाडी, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे
एकत्र येण्याचे ठिकाण : वाघाडी थांबा, १० वाजे नंतर ५ पर्यंत कधीही भीम बंध येथे यावे
कार्यक्रमाची रूपरेषा :
अ) वाट सुर्या नदीची : ("पाऊले आदिवासी एकात्मतेकडे")
• वाघाडी स्थानका पासून भीम बांधाची पायी वाट, आणि भटकंती (अंदाजे 0.५ किमी)
• पर्याय २ - भटकंती इच्छुकांसाठी कासा वरोती पूल ते नदी लगत पायी (अंदाजे २ किमी )
ब) चर्चा आणि अनुभव देवाण घेवाण : (तंत्रज्ञानाचा उपयोग समाजुपयोगी बनविण्याचे संस्कार करूयात)
१) वैयक्तिक ओळख आणि परिचय
२) सामाजिक कार्याबद्दल अनुभव कथन
३) आदिवासी समाजा पुढील समस्या
४) आदिवासी विकासाची दिशा
५) आयुश रूप रेषा आणि विचार
क) आयेचा चुल्हा, वनभोजन : (पदार्थ बनवताना असलेली मायेची तुलना चव किवा विटामिन सोबत करू नये)
सहभागींनी स्वतः नदीकाठी बनवलेले जेवण नदीच्या काठावर सहभोजन व शतपावली
जेवण : सर्वांनी सहभागी होवून स्वयंपाक बनवणे
फराळ : किवा तत्सम पदार्थ आणणे उत्तम (जवळ दुकाने नाहीत, कासा २ किमी)
ड) निरोप : अभिप्राय, भविष्यातील कार्यक्रम, निरोप
वर्गणी : निशुल्क (स्वेछेने आयुश संचय मध्ये जमा करू शकता, ऑनलाईन ट्रान्स्फर )
Facebook Event Page : https://www.facebook.com/events/108448872648116/
Monday, 14 November 2011
जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत
जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत
जय मल्हार ! जय मल्हार ! गर्जु या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
... राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II
येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचे हि वर II२II
साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहार II३II
सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सुर्यांकित I
दावी राज्य हे जव्हार II ४ II
प्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होवू जीवावर उदार II ५ II
जय वंशी क्षेम असो
राजा विर्यो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ II
जय मल्हार ! जय मल्हार ! गर्जु या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
... राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II
येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचे हि वर II२II
साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहार II३II
सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सुर्यांकित I
दावी राज्य हे जव्हार II ४ II
प्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होवू जीवावर उदार II ५ II
जय वंशी क्षेम असो
राजा विर्यो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ II