Tuesday, 30 October 2012

AYUSH picnic cum get together @ Bhim Bandh, Waghadi



आयुश पिकनिक कम गेट टुगेदर, भीम बांध, वाघाडी
दिनांक :११/११/२०१२, रविवार
वेळ : सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००
ठिकाण : भीम बांध, सुर्या नदी, वाघाडी, तालुका डहाणू, जिल्हा ठाणे
एकत्र येण्याचे ठिकाण : वाघाडी थांबा, १० वाजे नंतर ५ पर्यंत कधीही भीम बंध येथे यावे
सहभागी होण्या साठी अर्ज जमा करा : www.picnic.adiyuva.in
वनभोजन कार्यक्रमाचा नकाशा : http://goo.gl/maps/J73VT

कार्यक्रमाची रूपरेषा :
अ) वाट सुर्या नदीची : ("पाऊले आदिवासी एकात्मतेकडे")
• वाघाडी स्थानका पासून भीम बांधाची पायी वाट, आणि भटकंती (अंदाजे 0.५ किमी)
• पर्याय २ - भटकंती इच्छुकांसाठी कासा वरोती पूल ते नदी लगत पायी (अंदाजे २ किमी )
ब) चर्चा आणि अनुभव देवाण घेवाण : (तंत्रज्ञानाचा उपयोग समाजुपयोगी बनविण्याचे संस्कार करूयात)
१) वैयक्तिक ओळख आणि परिचय
२) सामाजिक कार्याबद्दल अनुभव कथन
३) आदिवासी समाजा पुढील समस्या
४) आदिवासी विकासाची दिशा
५) आयुश रूप रेषा आणि विचार
क) आयेचा चुल्हा, वनभोजन : (पदार्थ बनवताना असलेली मायेची तुलना चव किवा विटामिन सोबत करू नये)
सहभागींनी स्वतः नदीकाठी बनवलेले जेवण नदीच्या काठावर सहभोजन व शतपावली
जेवण : सर्वांनी सहभागी होवून स्वयंपाक बनवणे
फराळ : किवा तत्सम पदार्थ आणणे उत्तम (जवळ दुकाने नाहीत, कासा २ किमी)
ड) निरोप : अभिप्राय, भविष्यातील कार्यक्रम, निरोप
वर्गणी : निशुल्क (स्वेछेने आयुश संचय मध्ये जमा करू शकता, ऑनलाईन ट्रान्स्फर )

Monday, 14 November 2011

जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत


जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत

जय मल्हार ! जय मल्हार ! गर्जु या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
... राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II
येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचे हि वर II२II
साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहार II३II
सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सुर्यांकित I
दावी राज्य हे जव्हार II ४ II
प्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होवू जीवावर उदार II ५ II
जय वंशी क्षेम असो
राजा विर्यो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ II

Saturday, 10 September 2011

Tuesday, 30 August 2011

जव्हारवारी

सध्या सर्वत्र दमदार पाऊस कोसळतोय. या पावसात भिजायची मजा काही औरच असते. मनसोक्त भिजायला भटक्या मंडळींची पावलं अ
नेक स्पॉटसकडे वळत असतात. ठाणे जिल्ह्यातलं जव्हार हे असंच एक मस्त ठिकाण. तुफान कोसळणारा धबधबा, अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवायला इथे जरुर भेट द्यायला हवी.

........

जव्हार हा खरं तर महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित, दुर्गम असा भाग. पण, पावसाळ्याच्या दिवसांत इथलं वातावरण मनाला अक्षरश: वेड लावतं. दाट धुकं, थंड हवा, तुफान कोसळणारा पाऊस असं धुंद वातावरण वातावरण इथे पावसाळ्याच्या दिवसांत अनुभवायला मिळतं. जव्हारला 'महाराष्ट्रातलं चेरापुंजी' अशी उपमा देण्यास हरकत नाही. अप्रतिम निसर्गसौंदर्याचं वरदान जव्हारला लाभलं आहे. खळाळणारं पाणी, फेसाळत्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर इथे येण्याला पर्याय नाही. जव्हारमध्ये प्रवेश करताच अंदाजे ४०० मीटर्स खोली असलेली नारळीदरा ही दरी पहायला मिळते. त्यात अनेक छोटे-मोठे धबधबे वहात असतात. जव्हारचा हनुमान पॉइण्ट तर प्रसिद्धच आहे. तिथे उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्गसौंदर्याचा नजराणाच तुमच्यासमोर खुला होतो. अतिशय उत्कृष्ट असा हा व्ह्यू पॉइण्ट आहे. याशिवाय सूर्यास्त पाहण्यासाठी इथला सनसेट पॉइण्ट प्रसिद्ध आहे.

जव्हारचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला प्रचंड असा दाभोसा धबधबा. तुफान वेगाने कोसळणारं पाणी पाहून अंग शहारतं. जवळपासच्या २०० चौरसकिलोमीटर्सच्या परिसरात इतका मोठा धबधबा दिसणार नाही असं इथली स्थानिक मंडळी छातीठोकपणे सांगतात. या धबधब्यातल्या पाण्याचे तुषारच सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उडत असतात. त्यात भिजणं म्हणजे अहाहा... या धबधब्याशिवाय इथे हिरडपाडा धबधबाही आहे. अलीकडेच बांधण्यात आलेलं खडखड धरण लोणावळ्यातल्या प्रसिद्ध भुशी डॅमची आठवण करून देतं. जोरदार पावसाने हे धरण भरुन वाहू लागलं की त्या पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटता येतो. पाण्यात भिजण्यासाठी तिथे खास पायऱ्याही बांधण्यात आल्या आहेत. जव्हारपासून सुमारे ६ ते ७ किलोमीटर्सवर हे धरण आहे. इथली आदिवासी आणि वारली संस्कृती प्रसिद्ध आहे. चिंब भिजून कडकडून भूक लागली की इथली गरमागरम नागलीची भाकरी आणि त्यासोबत उडदाचं भुजा खाण्यातला आनंद म्हणजे केवळ अवर्णनीय.

कसं जाल?

मुंबई-अहमदाबाद हायवेवरुन निघाल्यास मनोरच्या मस्ताननाक्याजवळून जव्हारला जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने विक्रमगड आणि तिथून जव्हारला पोहोचता येतं. याशिवाय भिवंडीहून वाडा-विक्रमगड करून जव्हारला पोहोचता येतं. रेल्वेने जायचं असल्यास पश्चिम रेल्वेच्या पालघर आणि डहाणू रेल्वेस्टेशनहून जव्हारला जाणाऱ्या बस सुटतात. शिवाय ठाणे-कल्याणहूनदेखील जव्हारला जाणाऱ्या बस आहेत. जव्हारमध्ये राहण्यासाठी काही हॉटेल्सची व्यवस्था आहे.

Sunday, 31 July 2011

Jawhar Darshan

Jawhar is a hill station located at an altitude of 518m. It is about 80 kms from Nasik and 180 kms away from Mumbai. Situated in the Thane district, Jawhar is known for its picturesque setting and a vibrant cultural heritage. It is also known as the ?Mahabaleshwar? of Thane district. It is one of the very few tribal kingdoms in Maharashtra and is famous for its vibrant Warli paintings that are a characteristic landmark of this place. Besides trekking in the hills, one can appreciate and buy the Warli paintings. These paintings were traditionally made of rice paste and were used to decorate village huts.The theme was mostly village life. Today, they are also painted on paper and canvas and can be bought as souvenirs. Tourists can visit Lonavla and Khandala for picnics and trekking..

Jawhar Darshan | Sunset Point

Nearly 0.5 km away towords west from the heart of the city is the heritage of lovers called Sunset point The Shape of the vallay is like Bow (Dhanush) therefore earlier was known as Dhanukamal.The views of sunset from this loacation is so Marvolous that one can say I think i mat Bombay point of 'Mahabaleshwar.' While the sunsets, the mountain of Mahalaxmi near Dahanu which is nearly 60km from Jawhar can be seen easily and we can see the sun at the nearest The rays of sun spreads in the dark bushes in the valley the seen is so beautiful which cant expressed in words.

Jawhar Darshan | Hanuman Point

On the east side of the city from nearly 1 to 2 km from the heart of the city there was a old temple of maruti which was surrounded by dark forest of cactus , thus known as Katya Maruti mandir.Ahead of mandir there is a vally .The temple is surrounded by vally from three side. the vally is nearly 500 feet deep As the development is done the temple is renovated and now it is known as hanuman Point. From this point at the time of night we can see the lights of train in Kasara ghat in
day we can see historical fort of Shahapur Maholi.Early in the morning the vally of mountains are covered with dark fog slighlty we can say that every where is water .But as the fog disappears we can see beautiful greenry .Just after that we can see the sun rays rising from behind the hill.The vally also known as Devkobacha Kada Among this our freedom fighter and most beloved Veer Savarkar also lives here in his childhood . The hanuman point (Sunrise Point ) is there a most beautiful place from where we can see sunrise beautiful vally, high hills & the Royal Jaivilas Palace.

Dahanu Mahalaxmi Yatra

Find us on Facebook